सचिन कुडमथे तालुका प्रतिनिधी कोरपना
शेतकरी संघटनेच्या वतीनं नेत्र व अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश राठोड व डॉक्टर प्रतिमा चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने कोरपना येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले
आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण पाटील नवले आणि उद्घाटक राजुरा विधानसभेचे माजी आमदार वामनराव चटप हे होते. तालुक्यातील गोरगरीब जनतेनं ४०० ते ५०० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला व यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. अविनाश मुसळे, बंडू राजूरकर, नीलकंठ कोरंगे, रमाकांत मालेकर, प्रवीण एकरे, अडव्होकेट मुसळे, मोहब्बत खान , सुभाष तूरांकर, नदीम सय्यद, यांनी प्रयत्न घेऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडले.