सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
आळे ता. १९ आळे (ता. जुन्नर )येथील महात्मा ज्योतिबा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सभासदांची दिवाळी गोड करण्यात आली आहे. संस्थेच्या मुख्य कार्यालय ,आळे येथे मंगळवार ( दि.१५) रोजी सर्व सभासदांच्या उपस्थितीत वाटप समारंभ करण्यात आला.
पतसंस्थेच्या कार्यालयात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती प्रीतम काळे व पत संस्थेचे बिनविरोध निवड झालेले नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र (प्रकाश )वाघोले यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.आळे येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजयनाना कुऱ्हाडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली कुऱ्हाडे,जुन्नर पंचायत समितीचे माजी उपसभापती व पतसंस्थेचे संस्थापक गंगाराम लक्ष्मण गुंजाळ, पतसंस्थेचे संस्थापक चंद्रकांत पाटील भुजबळ, प्रताप कुऱ्हाडे, सल्लागार सहादू शिंदे,जुन्नर पंचायत समितीचे माजी सदस्य जीवन शिंदे, यांच्यासह पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र (प्रकाश ) वाघोले माजी अध्यक्ष सागर गुंजाळ, उपाध्यक्ष सुधीर (बाजीराव )लाड, सचिव सुरेखा भुजबळ, खजिनदार दिनेश चौगुले, संचालक रविंद्र गुंजाळ, किशोर कुऱ्हाडे अमर सहाणे, शैला विलास शिरतर, दादासाहेब बहिरट, स्वीकृत तज्ञ संचालक बाळासाहेब डावखर, उमेश कुऱ्हाडे, गोपाळ कुऱ्हाडे, शिवाजी कुऱ्हाडे, चारूदास साबळे,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळकृष्ण महाराज कुऱ्हाडे, पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच गणेश गुंजाळ,दिगंबर घोडेकर, सौरभ डोके, निलेश भुजबळ यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.
यावर्षी पतसंस्थेच्या वतीने सर्व सभासदांना दीपावली निमित्त संस्थेकडून दीपावली भेटवस्तू म्हणून ५ लिटर सनफ्लॉवर तेलाचा डबा देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे तसेच १५% लाभांश देखील सर्व सभासदांना देण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रविंद्र वाघोले यांनी दिली. पतसंस्थेच्या प्रगतीविषयी माहिती देताना अध्यक्ष रविंद्र वाघोले म्हणाले की, संस्थेची स्थापना ही १९९४ साली झाली असून संपूर्ण जुन्नर तालुका कार्यक्षेत्र आहे. पतसंस्थेचे १५४७ सभासद आहे.भागभांडवल तीन कोटी रुपये इतके तर वसुल भागभांडवल एक कोटी ९८ लाख ७८ हजार ७५० रुपये आहे.संस्थेमधे ३१ कोटी ३५ लाख१८ हजार २५९ रुपयांच्या ठेवी असून पतसंस्थेला आर्थिक वर्षात ६० लाख ७६ हजार ३४७ रुपयांचा नफा झाला आहे. पतसंस्थेच्या कार्यालयातून सभासदांनी आपली भेटवस्तू ३१ऑक्टोबर पर्यंत कार्यालयीन वेळेत घेऊन जावी असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर लाड व मुख्य कार्यकारी अधिकारी बाळकृष्ण महाराज कुऱ्हाडे यांनी केले.


