संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी : यश मिळवायचे असेल तर तुमचे प्रामाणिक प्रयत्न आणि प्रयत्नाला सकारात्मक दृष्टीने बघने महत्वाचे आहे.आणि या स्पर्धात्मक युगात यांची सुरुवात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना त्या संकल्पना रुजविणे गरजेचे आहे प्रत्येक विषयाकडे सकारात्मक दृष्टीने बघून त्यासाठी सातत्य, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची क्षमता तुमच्यात निर्माण करावी. यशाला कुठेच शाॅटकट नसतो असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात आनंददायी शनिवार अंतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी आणि करीअर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी घाटंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजू घोडके यांनी आपले स्वत:चे स्पर्धा परीक्षेतील अनुभव व्यक्त करतांना मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रतिपादन केले. यावेळी प्राचार्य फिरोज पठाण पर्यवेक्षक मनोज बुरांडे अविनाश ठाकरे, धनंजय अंजीकर,संदीप गोडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी इंग्रजी अध्यापक महेश वाघाडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असताना केन्द्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा त्यांचे टप्पे, प्रशासनातील विविध पदे , त्यांची कामे आणि विद्यार्थ्यांनी अवलंबवायचे अभ्यास तंत्र, शाॅर्ट ट्रिक्स विद्यार्थ्यांना सांगितलें. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत उगले प्रास्तविक मनोज बुरांडे तर आभार इम्रान शेख यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेंद्र नार्लावार,गजानन कापसे, ज्ञानेश्वर मस्के, समिर अहिरकर ,राजेंद्र वातीले, आकाश अहिरकर, विनोद ठाकरे ,अनुप मानकर ,संदीप नखाते विजय भगत, स्मिता पडवे, चारुशीला पंधरे, प्रफुल्ल गुल्हाने जयमाला जुमनाके, मंजुषा इंगोले,रविंद्र डांगे , गजानन उत्तरवार यांनी परिश्रम घेतले.


