अजीज खान
शहर प्रतिनिधी ढाणकी
पल्लवी प्रकाश पाईकराव अतिशय दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या बंदी भागाच्या मुख्य दार समजल्या जाणाऱ्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी या गावात जन्मलेली भीम घडला असा या मराठी किशोर कादंबरीची तरुण लेखिका आहेत . 14 एप्रिला प्रथम आवृत्ती प्रकाशित करून ‘भीम घडला असा’ या किशोर कादंबरी प्रसिद्धीच्या झोतात आले. या किशोर कादंबरीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव व संघर्ष आपल्या खास शैलीत टिपणारी लेखिका म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली. त्यांच्या या किशोर कादंबरीचे प्रकाशक निर्मल कुमार यांनी विशेष कौतुक केले होते.
लेखिका पल्लवी प्रकाश पाईकराव म्हणतात की, आमच्या सारख्या मागास वर्गीय समाजामध्ये बाल संस्कार खूप कमी मिळतात त्यात एकमेव कारण म्हणजे शिक्षण आमच्या समाजात आमचे आई वडील उच्च शिक्षित नसतात, जेमतेम तेम दहावी किंवा बारावी पर्यंत शिक्षण त्यात ही गरिबी मुळे काम धंदे शोधण्यात मुलं बाळा कडे लक्ष रहात नाही व लक्ष दिले तर त्यांना ज्ञानाचे संस्कार टाकण्यासाठी महागडे पुस्तकं घेता येत नाही म्हणून मी एम. पि. एस. ची तयारी करताना अभ्यास करताना येणाऱ्या संकटाचा विचार करताना वाटले की, आपण विदेशात नुसतं शिक्षण घेण्याचं लक्ष मानतो पण तिथ पर्यंत जाण्यासाठी आपल्याला किती संघर्ष कराव लागतो. त्यावेळी एवढी साधन नसताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना किती संघर्ष करावा लागला असेल याचा शोध घेताना मला ही ‘भीम घडला असा”किशोर कादंबरी लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
वाचक त्यांच्या लेखनशैलीचे इतके प्रसंशक झाले आहे की, त्यांनी विक्री साठी नागपूर येथे आराध्य स्टॉल मध्ये ठेवलेल्या पुस्तकाची आणखी मागणी केली आहे. लेखिका ची आई म्हणते की नागलोक परिसर मधील समाज सेविका अंजली सेंढे यांनी ही कादंबरी वाचली असता लहान लेकरांना समजेल अशी सोपी आणि सुरळीत भाषेचा कौतुक करून मुलांना भेट देण्यासाठी विकत घेण्याची इच्छा दर्शवली आहे. तसेच के एम हॉस्पिटल मध्ये कार्यरत असलेले सुशांत सारंग यांनी सुद्धा पुस्तकाच्या कॉपी विकत घेतले आहे.तर नागपूर मध्ये कार्यरत असलेले ए. पि. आय वाढवे यांनी सुद्धा पुस्तकाची मागणी केली आहे.”भीम घडला असा”या किशोर कादंबरी च्या लोकप्रियता पहात पल्लवी प्रकाश पाईकराव वाचकासाठी दुसऱ्या कादंबरीवर लिखाण चालू असून आपल्या वाचकासाठी लवकरात लवकर प्रकाशित करण्याचे विचार त्यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अधीकाऱ्या जवळ व्यक्त केले.