जलील शेख
तालुका प्रतिनिधी पाथरी
निवडणुक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली आहे . पाथरी विधानसभा निवडणुकीत विविध पथकांची स्थापना करत सर्व पथकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे.सर्व पथकातील सदस्यांनी निवडणुकीचे काम करताना वेळेवर व अचूक होण्यासाठी पथकांनी निवडणूक कामे समन्वयाने करावेत असे निर्देश देत निवडणूक कामे व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाने विविध कक्षांची स्थापना केली असल्याचे यावेळी सांगितले आहे .निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष तथा नामनिर्देशन कक्ष, संगणक कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष, कायदा व सुव्यवस्था कक्ष, मनुष्यबळ व्यवस्थापन कक्ष, वाहतूक आराखडा कक्ष, लेखा विभाग,ई.व्ही.एम./व्ही.व्ही.पॅट कक्ष,मतदान साहित्य कक्ष, टपाली मतपत्रिका कक्ष, मतपत्रिका कक्ष,मतदार यादी कक्ष, प्रशिक्षण कक्ष, एक खिडकी सुविधा कक्ष, स्ट्राँग रूम, मिडिया सेंटर कक्ष,स्विप कक्ष,मा.निवडणूक निरीक्षक कक्ष, आरोग्य कक्ष, तक्रार व निवारण कक्ष अशी एकूण २६ पथकांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.या सर्व पथकांच्या कामावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांचे लक्ष राहणार आहे.त्यांना सहाय्य करण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड , सुनील कावरखे व शंकर हंदेशवार काम पाहणार आहेत . निवडणूक विभागातील जी .एल .अन्नपुरे, जे व्ही धारासुरकर ,भालचंद्र जामकर आदी परिश्रम घेत आहेत.