जलील शेख तालुका प्रतिनिधी पाथरी
पाथरी नगर परिषद अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नाव नोंदणी व मदत कक्षा स्थापनेचा शुभारंभ पाचवी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत मुख्याधिकाऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याचप्रमाणे आणखीण दोन मदत केंद्राचे नगरपालिकेच्या वतीने शुभारंभ करण्यात येणार आहेत यामध्ये महात्मा फुले मंगल कार्यालय पाथरी व बळवंत वाचनालय पाथरी या मोक्याच्या ठिकाणाचा समावेश आहे.आवश्यकतेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण मदत केंद्रामध्ये वाढही करण्यात येईल असे नगर पालिकेचे मुख्यधिकारी तुकाराम कदम यांनी सांगितले.सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिला पर्यंत पोहोचावा हा शासनाचा उद्देश्य आहे.म्हणून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन या प्रसंगी मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले.