मारोती सुर्यवंशी शहर प्रतिनिधी नरसी
नरसी: गेल्या एक जुलैपासून मातंग समाजाच्या विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सर्वपरिचित प्रा. रामचंद्र भरांडे संस्थापक अध्यक्ष लोक स्वराज्य आंदोलन या संघटनेच्या माध्यमातून आमरण उपोषणाला बसले होते त्यातील प्रमुख मागण्या मागासवर्गीय आरक्षणाचे अ.ब.क.ड.असे वर्गीकरण करणे,सन. 2008ला लहूजी साळवे अभ्यास आयोगाची स्थापना केली होती त्यात त्यांनी 80 शिफारशी लागू करण्यात यावे अशी मागणी केली होती त्यातून एकुण 68 शिफारशी स्वीकारल्या (स.न.2011)पासुन रखडलेला लहूजी साळवे अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करणे, मौजे नरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील मुख्य चौकात लोकशाहिर साहित्य सम्राट डॉ.आण्णा भाऊ साठे यांचा पुतळा सन्मानाने बसविण्यात यावा , प्रत्येक तालुक्यात मातंग समाजाच्या दोनशे विद्यार्थीचे वस्तीगृह उभारण्यात यावे , आण्णा भाऊ साठे महामंडळाचे बजेट वाढवावे, यांसह विविध प्रकारच्या न ऊमागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे उपोषणाला बसले होते अखेर आज आ.बालाजीराव कल्याणकर यांच्या सहकार्याने मा.ना.एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी फोन करून उपोषणाबद्दल माहिती जाणून घेतली वउपोषण मागे घेण्यास सांगितले आणि आपण आपल्या शिष्टमंडळासह मुंबई येथे या आपण सर्वांनी एकत्र बसून त्यावर चर्चा करु किंवा मी नांदेड जिल्ह्यातील दौरा साठी येईल तेव्हा आपण चर्चा करु असे आश्वासन दिले त्यामुळे प्रा. रामचंद्र भरांडे यांनी उपोषण सोडताना साहेब तुम्ही मला वेळ आणि तारीख द्या तेव्हा तुम्ही शिष्टमंडळासह मुंबई येथे या आसं म्हणुन फोन ठेवला.सध्या प्रा. रामचंद्र भरांडे हे नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंह शासकीय रुग्णालयात ICU मध्ये उपचार घेत आहेत त्यांची तब्येत खालावत चालली होती.या सर्व मागण्या मान्य करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सकल मातंग समाजाच्या सर्वच संघटनांनीदेखील आपापल्यापरीने मतभेद बाजूला ठेवून या आंदोलनात सहभागी होत मोठा लढा उभारण्याची गरज आहे असे आवाहन प्रा. रामचंद्र भरांडे यांनी केले.











