शुभम गावंडे ग्रामीण प्रतिनिधि बोरगाव मंजू
बोरगाव _नजीक असलेल्या वनी रंभापुर येथील रहिवासी असलेले योगेश बोधडे यांची परिस्थिती सर्वसामान्यप्रमाणे असूनही स्वतः छोटा मोठा काम धंदा करून वयाच्या 17 व्या वर्षी पासून सामाजिक कार्यात आवड असणाऱ्या ‘अपघात ग्रस्त लोकांना मदत ‘रुग्णांना रक्त पोहोचवणे’ स्वतः रक्तदान करणे ‘तसेच रात्री बे रात्री सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणे हा वसा त्यांनी कितेक वर्षापासून सुरू केला आहेत्यांनी आतापर्यंत तीस ते पस्तीस वेळ स्वतः रक्तदान करून समाजातील युवकांची फळी तयार केली आहे या इतरही शेतमजूर शालेय विद्यार्थी यांच्यासाठीही हा युवक आंदोलना करिता समोरच असतो या युवकाला संबंधित परिसरातील युवक वर्ग ज्येष्ठ वर्ग मोठ्या उत्साहात सहकार्य करत असते या सामाजिक कामांमुळे त्यांना राजकीय वारसा गेल्या तीन पंचवार्षिक पासून लाभलेला आहे सलग तीनदा त्यांनी ग्रामपंचायत वर विजय मिळवला असून येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती साठी या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.