कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद
वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे , समाजासाठी नेहमी प्रयत्नशील राहणारे वंचित बहुजन आघाडी पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांचा जन्मदिवस वंचित बहुजन आघाडी पुसद कार्यकारिणी मार्फत बुद्धरत्न भालेराव यांची फळ तुला करून साजरा करण्यात आला. सामाजिक कार्य तसेच समाजाच्या विविध समस्या त्यांच्या कार्यशैलीतून मार्गी लावणे अशी त्यांची ओळख आहे. नुकतेच झालेले नमुना ड , घरकुल , बेघरांना राहण्यासाठी घर आणि विविध असे आंदोलन यामुळे बुद्धरत्न भालेराव यांचे समाजामध्ये विशेष स्थान मिळते. बुद्धरत्न भालेराव यांची फळ तुला ,आणि त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडी पुसद तालुका स्तरीय बैठक पार पडली.या बैठकी मध्ये तालुका कार्यकारिणीचा विस्तार, तालुका शहर कार्यकारणी विस्तार,आणि युवक आघाडी ची स्थापना करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा,अध्यक्ष आणि जिल्हा महासचिव आणि तालुका पातळीवरचे पदाधिकारी,महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच पुसद शहर आणि तालुका कार्यकारणी चे शेकडो सदस्य उपस्थित होते.