सतिश लोखंडे जिल्हा प्रतिनिधी छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार अमित गोरखे साहेब हे निवडुन आल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात येथील. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याला अभिवादन करून एकमेकांना मिठाई भरवत सकल मातंग समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील प्रलंबित मातंग समाजाचे प्रश्न मार्गी लागतील असे सकल मातंग समाजाचे समन्वयक विनोद साबळे यांनी मत व्यक्त केले. आमदार अमित गोरखे साहेबांच्या निवडुन आल्यामुळे मातंग समाजामध्ये महाराष्ट्र सर उत्साह निर्माण झाला आहे. यावेळी सकल मातंग समाज समन्वय जेष्ठ नेते मार्गदर्शक मा. राजू खाजेकर , भाजपा प्रदेश सचिव मा. योगेश दणके ,भाजपा महीला सरचिटणीस सौ. मीनाताई मिसाळ , भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष सौ. छायाताई खाजेकर भारतीय दलित संसद मा. किशोर दणके ,विलास खोतकर ,कुणाल कांबळे , सुभाष मानवतकर ,कैलास पवार ,कचरु कांबळे ,वैभव थोरात ,सुरेश कांबळे ,मुकेश गायकवाड , उमेश गायकवाड , संजय आडगळे , नितीन वाघुले ,राहुल वडागळे , शरद साबळे गोटु साळवे आदींसह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.


