रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
तालुक्यात रुग्णवाहिकेची सेवा कोलमळली असताना अशक्य ते शक्य करून विकास पवार मित्रपरिवारांनी अखेर तेल्हारा शहर व तालुक्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्रसेवा म्हणजे हेच ते कार्य असून विकास पवार मित्र परिवाराने आता गावो गावी व्यसनमुक्ती करिता चळवळ उभी करून शिबिरांचे आयोजन करावे असे आवाहन आय आर एस अधिकारी तथा एडिशनल कमिशनर भारत सरकार समीर वानखेडे यांनी रुग्ण वाहिका लोकार्पण सोहळ्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात केले. तेल्हारा तालुक्यात आणि शहरात सदैव सामा जिक कार्यात पुढाकार घेणारे विकास पवार मित्रपरिवार तर्फे तेल्हारा तालुक्यातील आणि शहरा तील जनतेच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता जनते च्या सेवेसाठी दि 6 जुलै ला आधुनिक व सुसज्ज अश्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण समीर वानखडे व विकास पवार यांच्या मातोश्री सौ. राजकन्या पवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या थाटात करण्यात आले. या वेळी मुलाचे कौतुक व कार्य पाहून विकास पवार यांच्या मातोश्री सौ राजकन्या पवार ह्यांचे अभिमानाने उर भरून आले होते व डोळ्यांमध्ये आनंदअश्रू दिसून आले कार्यक्रम ला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता अढाऊ, ,डॉ. अशोक तापडिया ,वंचितचे जिल्हा पदाधिकारी संतोष रहाटे काँग्रेसच्या संजीवनी ताई बिहाडे जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे ,संजय अढाऊ, पंचायत समितीचे उपसभापती किशोर मुंदडा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अशोक दारोकार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भरत सिंग चव्हाण,शाखा अभियंता कपिल पवार,प स सदस्य अरविंद तिव्हाने मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष विजय देशमुख डॉक्टर बोबडे माजी नगरसेवक रामभाऊ फाटकर, आनंद राठी, भारत पोहरकार, वंचित चे शहर अध्यक्ष लखन सोनटक्के काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप खारोडे सोनूभाऊ मलीये युवासेना तालुका अध्यक्ष विक्की मंगळे, युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष सचिन पोहरकर,शाम खाडे मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सुरज साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते . तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था व रुग्णांचे होत असलेले हाल पाहता व सोबतच आरोग्य यंत्रणेची रुग्णवाहिका सेवा कोल मडली असताना तालुक्यात रुग्णवाहिका असणे आवश्यक आहे हे लक्षात आल्यानंतर 2022 पासून प्रयत्नात असताना आता ते स्वप्न साकार झाल्याचे विकास पवार यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून सांगितले व याची प्रेरणा समीर वानखडे यांनच्या पासून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. बहारदार सूत्र संचालन राहुल शृंगारकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन उज्वल दबळघाव सर यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून रुग्णवाहिकेची खरोखर तालुक्यासाठी किती नितांत आवश्यकता होती याबद्दल माहिती देऊन विकास पवार मित्रपरिवार यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यापूर्वी माहेश्वरी भवन येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये शकडो नागरिकां नी डोळ्याची तपासणी करून घेतली आयोजित कार्यक्रमा ला शहरासह तालुक्याती उपसरपंच, सरपंच, प स सदस्य, विविध पक्षाचे संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विकास पवार मित्रपरिवाराने अथक परिश्रम घेतले.











