विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
पुसद :प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २००३ मध्ये घेतला आहे गतवर्षी खरीप २०२३-२४मध्ये राज्यातील विक्रमी असे एक कोटी सत्तर लाख विमा अर्जद्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठया प्रमाणात लाभ घेतला विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानी पासून शेतकऱ्यास आर्थिक संरक्षण देण्याचे दृष्टिकोनातून ही योजना राबविण्यात आली आहे खरीप २०२४ हंगामात पेरण्या सुझाले आहेत पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाने पीक विमा पोर्टल सुरू करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपल्या पिक विमा काढून घ्यावा यासाठी जवळचे ऑनलाईन सुविधा केंद्रात सातबारा आधार कार्ड बँक पासबुक स्वयंघोषित पीक पेरापत्रक इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन जाणे गरजेचे आहे सदर पिक विमा अर्ज भरण्याकरिता अंतिम १५ जुलै अंतीम तारीख आहे तरी पुसद तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घ्यावा.


