स्वप्नील मगरे तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड तालुक्यातील मुळावा या गावी गुरूवारी सायंकाळी ६वा.दरमयान तरुणांचा खून करण्यात आला.मुळावा येथे जातीय दंगली नंतर खूनाचा या घटनेने मुळावा हादरले.घराचया शेजारीच राहणाऱ्या ३५वषीय तरुणाला चाकुने वार करुन गंभीर जखमी केले होते.पण आज शुक्रवारी दुपारी जखमी तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.अविनाश गिरजाजी.बावणे वय ३५असे मृत तरुणांचे नाव असून राहुल गणेश मन्ने १९रा.मुळावा असे हल्लेखोराचे नाव आहे.गरुवारी सायंकाळी ६वा.या दोघांमध्ये वाद झाला होता.त्यावेळी राहुलने धारदार चाकूने अविनाश च्या पोटात खुपसले चाकु अविनाश च्या शरीराच्या आरपार घुसला होता.रकतबंबाळ अवस्थेत त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा वरून उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.पण प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे रेफर केले होते.आज उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.मुळावा गावात अशा घटना घडत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.या घटनेचा तपास ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिटजमादार देविदास आठवले, संदीप शेरे करत आहे.