असा प्रश्न उपस्थित झाल्याने पातुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे न .प गटनेते हिदायत खा रुम खा यांनी तहसीलदार मार्फत पंतप्रधानांना पत्रा द्वारे केली मागणी
किरण कुमार निमकंडे
तालुका प्रतिनिधी
साप्ताहिक अधिकार नामा
पातूर शहरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामी पिका करिता शेती पिक काढण्याकरिता लागणाऱ्या रासायनिक खतांचे भाव महागल्याने शेतकरी हा हतबल व आर्थिक परिस्थितीने दुर्बल झाल्याचे चित्र संपूर्ण देशात राज्यात व जिल्ह्यात दिसत आहे त्याचे मूळ कारण म्हणजे सध्या स्थितीत देशांमध्ये लाॅक डॉउन , नैसर्गिक संकट, पेट्रोल डिझेलचे वाढते भाव असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना यामधून वाचवण्याकरिता येणार्या पावसाळी हंगामी पिक उत्पादन करिता रासायनिक खतांची वाढते भाव हे अतिशय कमी दरात मिळावे जेणेकरून शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढणार नाही व सावकारी पासून वाचवता येईल याकरिता पातुर तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे नप गटनेते हिदायत खा रुम खा उर्फ ईंदु पैलवान यांनी देशाचे पंतप्रधान यांना तहसीलदार दीपक बाजड यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाच्या लेटर पॅड वर रासायनिक खतांचे दर कमी करावे अशी पत्र लिखित देऊन मागणी केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली , न.प गटनेते हिदायत खा रुम खा, विजय चव्हाण मळसुर, विजय बोंचरे आलेगाव, पुरुषोत्तम ताले सायवनी,
सागर कढोणे, प्रवीण इंगळे, श्रीधर जनार्दन लाड, परसराम बंड यांच्या उपस्थितीत लिखित पत्र देण्यात आले


