जीएमसी यांच्या बेजबाबदारपणामुळे नियोजित तारखेत मुलाखत न घेताच शेकडो उमेदवाराना पाठविले घरी
ब्युरो चिफ / अकोला
काेविड 19 आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासकीय वैद्यकीय रुग्णालय अकोला मध्ये कंत्राटी पदभरती करिता अधिपरीचारिका तसेच प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या कंत्राटी पदभरती घेण्यासाठी सदर मुलाखत दिनांक 17 /05/ 2021 रोजी दुपारी ठीक बारा वाजता नियोजित होती. तरीसुद्धा दिलेल्या तारखेस मुलाखत न घेता बेरोजगारीचा गैरफायदा घेत प्रशासनाने विद्यार्थ्यांची दिशाभूल केली.तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सदर पदभरती दिलेल्या वेळेत न घेता विद्यार्थ्यांना घरी पाठवून देण्यात आले व गरज असेल तर उद्या या असे उद्गार संबंधित अधिकाऱ्यांनी काढले तसेच बाहेरगावाहून आलेले बेरोजगार उमेदवार दिलेल्या वेळेपर्यंत थांबले तरीसुद्धा निवड यादी सात वाजेपर्यंत सुद्धा लागली नाही. तसेच बाहेरगावच्या उमेदवारांना मानसिक त्रास सहन करावा लागला. एवढंच नाही तर अर्ज स्वीकृती बारा वाजेपर्यंतच असून सुद्धा काही लोकांचे अर्ज पडद्याआड सुद्धा घेण्यात आले. तसेच मुलाखत न घेता यादी लावण्यात आली व अशाप्रकारे या भरतीमध्ये ढवळाढवळ होताना दिसून आली. तरी सुद्धा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानासुद्धा शेकडो उमेदवारांना थांबविण्यात आले व पंकज पोहरे या उमेदवारांनी विचारले असता संबंधित अधिकार्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संबंधित अधिकाऱ्यांनी उमेदवारांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत थांबण्यास सांगितले तरीसुद्धा निवड यादी सहा वाजता लावण्यात आलेली नव्हती. त्यामुळे उमेदवारांची नाराजी व्यक्त दिसून आली.व उमेदवार घरी गेले तसेच संबंधित महिला कर्मचाऱ्यांना पंकज पोहरे यांनी विचारले असता मला काहीही माहीत नाही असे त्यांनी उत्तरे दिली. तसेच उमेदवारांना सहा तास थांबून सुद्धा मुलाखत न घेताच पाठवून दिले. व शेकडो उमेदवारांना एका हॉलमध्ये थांबवून कोरोनाच्या नियमाचे पालन न करता पालकमंत्र्यांचा जिल्हा दौरा असतानासुद्धा नियमाचे उल्लंघन थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिसुन आले.तरी अशा प्रकारे या पद भरतीत बेजबाबदारपणा दिसून आला. तरी झोपलेल्या प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने काढलेल्या कंत्राटी पदभरतीची मुलाखत नियोजित तारखेत न घेता शेकडो विद्यार्थ्यांना हॉलमध्ये सहा तास बसून कोरोना नियमांचे उल्लंघन पालक मंत्री यांचा अकोला दौरा असतानासुद्धा अधिकाऱ्यांकडून होत आहे. तरी झोपलेल्या प्रशासनाला याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
- पंकज पोहरे (उमेदवार)