पातूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
पातुर केंद्र सरकारने रासायनिक
खतांच्या किमतीची वाढ केल्याने पातूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या बाबीचा निषेध करण्यात आला.असून ही किंमत कमी करण्याचे विनंती करणारे निवेदन पातुर चे तहसीलदार दीपक बाजड यांना सोमवारी दिले आहे. रासायनिक खतांची केंद्र सरकारने केलेल्या किंमतींच्या प्रभावाचा निषेध म्हणून पातूर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने तहसीलदारांना विनंती केली आहे की कोरोना मुळे कठीण परिस्थितीतून जात आहे. तरी ही भाव वाढ कमी करण्यात यावी.अशी विंनती तहसीलदार पातूर यांना केली आहे यावेळी निवेदन देणाऱ्या मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष हिदायत खान रूम खान, तालुका अध्यक्ष जयसिंग जाधव, पातूरच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा बोंबटकार, मो मेहताब पहेलवान, पातुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष श्रीराम ताले, शिर्ला ग्रामपंचायत सरपंच पती सुधाकर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य फिरोजखान ठेकेदार, शिर्ला ग्रामपंचायत सदस्य सय्यद इरफान, विजय बोचरे, परसराम बंड, प्रवीण इंगळे, पातुर नगर
परिषदेचे माजी सदस्य विजय काळपांडे, राहील इकबाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (पातुर शहर युवक उपाध्यक्ष) प्रवीण इंगळे, नातिक शेख सय्यद अर्शद, सय्यद समीर, सय्यद कासम, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर महासचिव राहुल वाघमारे,आदी पातूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.