राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली – धानोरा तालूक्यातील सावरगांव पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या मोरचुल जंगल परिसरात आज सकाळी C ६० पोलिस जवान आणि नक्षवादयामध्ये चकमक उडाली या चकमकीत दोन नक्षल्याना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सी-६० जवानानी चकमकी नंतर शोध मोहीम अधिक तीव्र केल्यानंतर शोध घेत असतांना घटनास्थळीं दोन नक्षलवाद्यांचे मृतशव हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे या घटनेत मारले गेलेले नक्षल हे महिला कि पुरुष आहेत यांची माहिती अद्याप प्राप्त झाली नसली तरी घटनास्थळी रक्ताचा मोठ्या प्रमाणात सडा असल्याने जखमी आणी मृतकांची संख्या जास्त असल्याची शक्यता पोलिस सूत्राकडून व्यक्त करण्यात येत आहे . जंगलातील शोध मोहीम नतरच अधिक घटनेची माहिती पोलीस विभागाकडून प्राप्त होणार आहे. सावरगांव पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या मोरचुल जंगल परिसरात नक्षल असल्याची माहिती पोलिसाना प्राप्त झाली. होती त्याच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज सकाळ पासूनच नक्षल शोध मोहीम राबविण्यात आली होती आणि अचानकच शोध मोहीम सुरु असताना सात च्या सुमारास आज जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी C ६० जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला .त्यावेळी C ६० पोलिस जवानानी जशास तसे प्रतिउत्तर दिले. हि चकमक जवळपास तास भर चालली .मात्र C ६० जवानाचा वाढता दबाव पाहून जंगलाचा फायदा घेत नक्षल जंगलात पसार झाले. घटनास्थळी C ६० पोलिस जवानांनी शोध मोहीम अधिक तीव्र केले असुन नक्षल च्या दोन मृतदेह हस्तगत केल्याची प्राथमिक माहिती सूत्राकडून माहिती आहे.