रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
लोकांची कामे करण्यापूर्वी ते समजून घेण्यासाठी अलीकडे कुणाकडे वेळ नसतो. राज कारणात स्वारस्य असलेल्या व्यक्तीला तर अजिबातनसतो. मात्र त्याला अपवाद एक निघाले त्याचे नाव अनिल माणिकराव गावंडे. अनिल भाऊ अकोट,तेल्हारा तालुक्यात लोकजागर मंच या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सात वर्षांपूर्वी कामाला सुरुवात केली. लोकांची कामे करण्याआधी लोकांना नेमक्या कोणत्या कामाची, कशा प्रकारच्या मदतीची गरज आहे हे त्यांनी जाणून घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी चक्क समस्या दर्शन दौरा काढला. या दौऱ्याचा कोणताच तामझाम नव्हता. कोणत्याही गावात शिरायचे परिचित भेटले की त्यांच्या घरी चहापान करतांना शेती, जोडधंदा, दूध उत्पादन, मुलांना रोजगार, गावात शिक्षणाच्या अडचणी, शहरात असलेल्या मुलांच्या समस्या, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मिळणाऱ्या सुविधा अशा गप्पातून माहिती संकलित व्हायला लागली.खेड्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य माणसाला रोजच्या कार्यात काय अडचणी येतात याचा क्रम लावल्यावर लोकजागर मंचाचे खरे काम सुरू झाले. शेतकरी बचत गट, महिलांनी उत्पादित केलेल्या मालालाबाजारपेठ, लहान कर्ज घेताना घ्यायची काळजी यावर थेट बोलणी सुरू झाली. त्यातून पुढे शेतकरी दौरे झाले. शेकडो शेतकरी बारामतीला जाऊन आले. काहींनी शेतकरी उत्पादक कंपनीची गरज बोलून दाखवली, त्यावर सुद्धा काम झाले. काहीतरी भरीवकाम करण्याचे एखाद्या ने ठरवले की काय होऊ शकते याचे अनिलभाऊ गावंडे हे मूर्तिमंत उदाहरण झाले. लोकजागर पुढे लोकांची गरज म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात विस्तारत गेला. क्रीडा, युवक महिला, रोजगार, आरोग्य शेती या क्षेत्रात स्वतःहून काम करण्याची तयारी असणारे अनेक हात पुढे आले. काही गावांमध्ये पाणी संकलन झाले तर कुठे श्रमदान करून लोक वर्गणी तून पांदण रस्ते तयार व्हायला लागले शेतकरी बांधवांच्या हक्काच्या वाण च्या पाण्यासाठी लढा उभार ला,तेल्हारा शहरात एक आगळी वेगळी जत्रा भरवून बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले बचत गटांना चालना मिळाली शहरात अनेक वेळा रोग निदान शिबिरे घेऊन अनेकांना सहकार्य केले या सर्वांच्या पाठीमागे अनिलभाऊ गावंडे खंबीरपणे उभे होते व आहेत. अनिल भाऊ गावंडे हे आज रोजी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असून प्रहार संघटनेमार्फत सुद्धा विविध समाज उपक्रम ते तेल्हारा तालुक्यात राबवीतआहेत.यामध्ये तिळ मात्र शंका नाही.आगळे वेगळे रचनात्मक कार्यक्रम घेऊन सर्वांना आपलेसे वाटणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय मा .श्री.अनिल भाऊ गावंडे यांना वाढदिवसाच्या मनः पूर्वक खूप खूप शुभेच्छा.