शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : तालुक्यातील सातपुडाच्या पायथ्याशी असलेल्या शहानुर येथील शेतकरी रमेश हिरा मावस्कर हे आपल्या गट नंबर 23 या शेतात दररोज प्रमाणे काम करण्यासाठी गेले असता कोरड्या विहिरीतून अचानक आवाज येत होता.त्यांनी विहिरी जवळ जाऊन पाहले असता त्यांना विहिरीत दोन अस्वल पडल्याचे दिसले.त्यांनी गावात येऊन लोकांना माहिती दिली.व लगेच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरत्ने यांना माहिती दिली.वनविभागाचे अधिकारी हे ताबडतोब रेस्क्यू टीम ,वनरक्षक घेऊन शेतात पोंहचले व विहिरीत पडलेल्या अस्वलांना तात्काळ पिंजरा आणून विहिरीत सोडला.व पिंजऱ्याच्या सहाय्याने दोन अस्वल बाहेर काढण्यात आले.तत्पूर्वी डॉ चंद्रकांत धनदर यांनी अस्वलांची तपासणी केली त्यामध्ये एक नर व दुसरे मादी होते.दोन्ही अस्वलांचे वय दोन वर्षे असल्याचे त्यांनी सांगितले.हे दोन्ही अस्वल वन्यजीव क्षेत्रात बोरी जंगलात सोडण्यात आले.यावेळी नागरिकांनी अस्वल पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.बचाव कार्य आकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक जय कुमारण यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद सुरत्ने,बी एस अळसपुरे,व्ही एम गायकवाड,व्ही एन गावंडे,एस व्ही तराळे,मंगेश मावस्कर,मिलिंद डाखोरे,यांचा सहभाग होता.यावेळी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग तायडे,सुभाष सुरत्ने,आकाश तायडे,सरपंच राजु धुंदे,निलेश चव्हाळे,संजय मावस्कर,बालाजी आंधळे,मुश्ताक पटेल,शेख फारूक,दशरथ बेलसरे,यांच्यासह गावातील नागरिकांनि मदत केली.


