आसिफ खान
शहर प्रतिनिधि ढाणकी
ढाणकी : परिसरातील सावळेश्वर या गावी काल मन हेलावून टाकणारी घटना घडली.येथील पैनगंगा नदी पात्रात बुडून तीन चिमुकले गतप्राण झाले याबाबत सविस्तर माहिती अशी की,बुधवार २६ जून दुपारी १२ वाजताचे सुमारास, सावळेश्वर येथे पैनगंगा नदी पात्रात आंघोळ करताना, दोन मुली सह त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एका मुलाचा बुडून मृत्यू झाला सावळेश्वर येथे मामाच्या गावी आलेली कावेरी व तिची मैत्रीण अवंतिका या दोघी पैनगंगा नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. धुणे आटोपल्यानंतर दोघीही आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात नदीपत्रातील डोहात बुडू लागल्या. त्यांनी आरडाओरडा केला असता त्या ठिकाणी चेतन देवानंद काळबांडे व शुभम सिद्धार्थ काळबांडे (२२) हे दोघे मदतीसाठी धावले. दोघांनीही नदीपात्रात उडी मारून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता, घाबरलेल्या कावेरी आणि अवंतिका ने चेतनला घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकरी त्या ठिकाणी आले. शुभमला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. चौघांनाही नदीतून बाहेर काढून ढाणकीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. डॉक्टरांनी कावेरी , चेतन व अवंतिका यांना मृत घोषित केले. शुभम याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला तातडीने यवतमाळ येथे हलविण्यात आले.चेतन देवानंद काळबांडे वय अंदाजे १६ वर्ष. सात आठ वर्षांपूर्वी सर्पदंशाने चेतनच्या वडीलांचे छत्र हरवले आईला एकुलता एक असलेला आधार चेतन नदीपत्रात बुडून नाहीसा झाला. त्याच्या कुटुंबात त्याची आई व एक छोटी बहिण आहे तसेच लहानपणापासून अभ्यासासोबत नृत्य सोशल मीडियावरील इंटरनेटचा अभ्यास या गोष्टीचा छंद असलेली अवंतिका राहूल पाटील वय अंदाजे १४ वर्षे हिच्यावर सुद्धा काळाने घाला घातला. आणि पुढील शिक्षण घेण्याच्या उद्देशाने आपल्या मामाच्या गावी मुळ गांव बाभळी येथून आलेली कावेरी गौतम मुनेश्वर वय अंदाजे १५ वर्ष हिला सुद्धा या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला दोघे सावळेश्वर व एक बाभळी येथील मुलगी यांचा पैनगंगा नदी पात्रात बुडून करून अंत झाला. या घटनेने ढाणकी/ सावळेश्वर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.