स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
युनिक इंटरनॅशनल स्कूल चा सोहळा मोठ्या थाटामाटा संपन्न झाला उमरखेड : हे जग स्पर्धेचे जग असून या काळात विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळणे गरजेचं आहे,शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्वगुण संपन्न आढळून येतो अस प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक तथा लेखक शरद तांदळे यांनी उमरखेड येथे नव्यानेच सुरू झालेल्या युनिक इंटरनॅशनल स्कुल च्या उद्घाटन प्रसंगी केले.युनिक इंटरनॅशनल स्कूलचा नुकताच शुभारंभ सोहळा पार पडला असून उद्घाटक प्रसंगी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे , नगरपालिकेचे मुख्य अधिकारी महेशकुमार जामनोर , युवा उद्दोजक तथा लेखक शरद तांदळे पोलीस उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड, माजी आमदार विजयराव खडसे ,सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे , शिवसेनेचे (उबाठा ) कृष्णा पाटील आष्टीकर जि.प. चे माजी अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर निधी भोपळा मॅडम यांनी केले उमरखेड शहरातील व ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना अत्यल्प दरात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे याकरिता मी कटिबद्ध आहे. तसेच संचालिका प्रियंका रामराव चौधरी यांनी केले कीलानुरूप शिक्षण क्षेत्रात होणारे बदल सामोरे ठेवून नवीन पूर्ण संकल्पना राबवून कौशल्यपूर्ण शिक्षण पद्धतीला प्राधान्य देणे हे युनिकचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी सांगितले याप्रसंगी पालक वर्ग तथा नागरिक व महिलाचा मोठ्या संख्येने सहभाग होता.