स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन अजूनही पालक यातून धडा घेत नसून अल्पवयीन मुलांच्या हातात गाडीचे स्टेअरिंग देत आहेत.पालकांना मुलांना गाडी चालवायला देण्यात कुठला गर्व चढत आहे हे समजायला तयार नाही. एका होतकरू तरुणाला यांच्या मजा मस्तीत आपला जीव गमवावा लागल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. पालक अजूनही सजग होत नसल्याने असे अपघात कधी थांबणार हे एक कोडे बनून राहत आहे.शिरुर तालुक्यातील अरणगाव येथेही पोर्शे पॅटर्नचीचं पुनरावृत्ती झाली असुन पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दि ३१ मे २०२४ रोजी सकाळी १० : १५ च्या सुमारास मालवाहू पिकउप चालविताना दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असुन दुसरा व्यक्ती जखमी झाला आहे.अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अरुण विठ्ठल मेमाणे असून त्याचा मित्र महिंद्र राउसाहेब बांडे हा जखमी झाला आहे.हे दोघेही स्प्लेंडर मोटार सायकलवर रोहित्राचे ऑइल आणण्यासाठी वडगाव बांडे (ता. दौंड) येथुन न्हावरे गावात निघाले होते. जाताना मोटार सायकल अरुण मेमाणे हा चालवित होता. त्याच्या पाठीमागे महिंद्र बांडे हा बसलेला होता. मोटारसायकल अरणगाव (ता. शिरुर) येथे आली असताना त्यांच्या मोटार सायकलला अरणगावातील पिकअप गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलीने समोरासमोर धडक दिली. यात दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला तर महिंद्र बांडे हा जखमी झाला.अपघात एवढा गंभीर होता की मालवाहु पिकअपने मोटार सायकलसह चालकास 20 ते 30 फुट फरफटत नेले. ही पिकअप अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची असून त्यांची अल्पवयीन मुलगी (अंदाजे वय 15) चालवत होती. तिच्या सोबत शेजारील सिटवर पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते. सदर मुलीने तिच्या ताब्यातील सदरचा पिकअप हा जोरात भरधाव वेगात चालवुन सायकलला समोरुन धडक देवुन सदरचा अपघात केला आहे. तसेच अपघात झाल्यानंतर मदत न करता ते दोघेही पिकअप सोडुन तेथुन निघुन गेले. याबाबत शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे मयत अरुण मेमाणे यांचा भाऊ सतिश मेमाणे यांनी फिर्याद दिली असुन अल्पवयीन मुलीचे वडील अरणगावचे पोलिस पाटील संतोष लेंडे यांच्यासह अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल झाला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास शिक्रापुर पोलिस करत आहेत.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)