शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548 बी चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. एक वर्षाच्या वर झाले तरीही पाच किलोमीटर अंतराची काम संपलेले नाही संबंधित गुत्तेदाराने या रस्त्याची माती विकून सेलूकारांची माती केली आहे. या रस्त्यावरील डिव्हायडर मध्ये शोभेच्या झाडे लावण्यासाठी काळ्या मातीच्या ऐवजी सर्रास दगडांचा उपयोग केला जात आहे. या रस्त्यावरील पथदिवे दोन महिन्याच्या वर झाले तरी सुरू झाले नाहीत. यामुळे अपघात होत आहेत. यात अनेक जण जखमी झाले आहेत व काहींनी आपला जिव गमावला आहे.संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या इंजिनीयरला वारंवार माहिती देऊनही यांनी यावर काहीच ॲक्शन घेतली नाही याचा निषेध म्हणून आज या रस्त्यावरील डिव्हायडरच्या दगडावर रांगोळी काढून यावर बेशरमाची झाडे लावण्यात आली. व निषेध करण्यात आला.अजूनही नीट कामे केली नाही तर याहून तिव्र आंदोलन सेलूवासियांतर्फे करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला. यावेळी सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548 बी चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. एक वर्षाच्या वर झाले तरीही पाच किलोमीटर अंतराची काम संपलेले नाही संबंधित गुत्तेदाराने या रस्त्याची माती विकून सेलूकारांची माती केली आहे. या रस्त्यावरील डिव्हायडर मध्ये शोभेच्या झाडे लावण्यासाठी काळ्या मातीच्या ऐवजी सर्रास दगडांचा उपयोग केला जात आहे. या रस्त्यावरील पथदिवे दोन महिन्याच्या वर झाले तरी सुरू झाले नाहीत. यामुळे अपघात होत आहेत यात अनेक जण जखमी झाले आहेत व काहींनी आपला जिव गमावला आहे.संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या इंजिनीयरला वारंवार माहिती देऊनही यांनी यावर काहीच ॲक्शन घेतली नाही याचा निषेध म्हणून आज या रस्त्यावरील डिव्हायडर च्या दगडावर रांगोळी काढून यावर बेशरमाची झाडे लावण्यात आली व निषेध करण्यात आला.अजूनही नीट कामे केली नाही तर याहून तिव्र आंदोलन सेलूवासियांतर्फे करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जयसिंग शेळके, अक्षय सोळंके, रवि मोगल, नरेश पांचाळ,गणेश काचेवर, कैलास बोराडे, पांडुरंग सावंत, सतिश आकात, शिवम गटकळ, हाके सर, पप्पु कदम, लक्ष्मण बोराडे, प्रद्युम्न शेळके,विकी राठोड, विश्वंभर दिक्षित,परवेज सय्यद, इरफान बागवान उपस्थित होते.