शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि.१४ मे २०२४ रोजी सेलू शहरात प्रथमच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा शक्ती सेवाभावी संस्था सेलू,ऋषी भैय्या अंभोरे मित्र मंडळ तर्फे छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या जिवन चरित्रावर आधारित संगीतमय नाटिका सादर करण्यात आली द ग्रुव्ह डान्स इन्स्टिटय़ुट तर्फे ‘धगधगता लावा स्वराज्याचा छावा’ या नाटिकाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय दादा रोडगे,साईराज भैय्या बोराडे, गुलाब ताठे,प्रसाद महाराज काष्टे,विनोद राजुरकर,ऋषी भैय्या अंभोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सादर केलेल्या नाटीका पाहताना अगदी अंगावर शहारे आणणारे प्रसंग कलाकारांनी सादर केलेल्या सीन मध्ये येऊ लागला. या कार्यक्रमाला प्रेक्षका कडून चांगला प्रतिसाद मिळाला.


