नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर दि. १६ गोरगरीब व तसेच ज्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही, अशा गरजू व पात्र लाभधारकांना संजय गांधी निराधार योजना ही संजीवनी ठरणार आहे. अशा पात्र व गरजू लाभधारकांनी या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या मानधनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिमायतनगर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजयकुमार वळसे पाटील धानोरकर यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होण्याकरिता लाभधारकांचे वय १८ ते ६५ वयोगटातील असावे. महाराष्ट्र राज्याचा लाभधारक हा पंधरा वर्षांचा रहिवाशी असावा. त्यांचे वार्षिक उत्पन्न २५ हजारापर्यंत असावे लागते. अपंग व दिव्यांग व्यक्तीसाठी प्रती वर्षे ५० हजारांपर्यंत उत्पन्न व वयाचा दाखला, वैद्यकीय अधीक्षक यांचे प्रमाण पत्र, विधवा, अपंग, दिव्यांग, तृतीय पंथी, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेली स्त्री, अव्यय स्त्री, इतर शारिरीक व ठळक व तसेच बलात्कारित स्त्री ही या योजनेची पात्र लाभधारक ठरू शकते. अशा सर्व पात्र व गरजू असणाऱ्या लाभधारकांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी सेतू सुविधा केंद्रामार्फत तहसील कार्यालयात अर्ज सादर करावेत. या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी मी अध्यक्ष म्हणून तत्परतेने काम करीत असून गरजू व तसेच पात्र लाभधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष विजयकुमार वळसे पाटील धानोरकर यांनी केले आहे.