रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
येणाऱ्या खरीप 2024 च्या अनुषंगाने तेल्हारा तालुक्यात सोयाबीन एक महत्त्वाचे पीक असून कृषी विभागामार्फत प्रत्येक गावामध्ये सोयाबीन बीज प्रक्रिया मोहिमेत ची सुरुवात करण्यात आलेली आहे याच अनुषंगाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्या उपस्थिती त सोयाबीन बीज प्रक्रिया मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी तळेगाव बाजार येथील येथील प्रगत शील शेतकरी जनार्दन खारोडे यांच्या घरगुती सोयाबीन बियाण्याची बीज प्रक्रिया करण्यात आली. तसेच त्याची उगवण शक्ती तपासणी यापूर्वीच कृषी वसंतअभियानांतर्गत कृषी विभागाने केलेली आहे. कृषी विभागामार्फत विविध खाजगी कंपन्याच्या साहा य्याने वेगवेगळ्या गावांमध्ये स्वयंचलित बीज प्रक्रिया करून देणारे यंत्र उपलब्ध करून देण्यात आलेले असून त्याचे गावनिहाय नियोजन करण्यात आलेले आहे.तळेगाव येथे जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी यांनी उपस्थि त शेतकऱ्यांना उगवण शक्ती तपासणी तसेच बीज प्रक्रिये चे महत्त्व समजावून सांगितले तसेच बीबीएफ व टोकन पद्धतीने मोठ्या प्रमाणात लागवड करून उत्पादन वाढ करावी असे आवाहन केले. त्यावेळी तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी येणाऱ्या खरीप हंगामाच्या दृष्टीने करावयाचे नियोजन याबद्दल शेतकऱ्यांशी चर्चा केली. गावचे कृषी सहाय्यक मनोजकुमार सारभूकन यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया चे प्रात्यक्षिक करून दाखविले.याप्रसंगी कृषी विभागातील विविध अधिकारी यांनी गावातील शेतकरी यांच्यासोबत संवाद साधून त्यांना येणाऱ्या विविध अडचणी तसेच विविध योजनांमध्ये येणारे घटक याबाबत विस्तृत चर्चा केली. तालुक्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात येते की त्यांनी बियाणे उगवनशक्ती तपासून व बीज प्रक्रिया करूनच सोयाबीन पिकाची जमिनीत योग्य ओलावा असताना पेरणी करावी यावेळी जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी सतीशकुमार दांडगे, मंडळ कृषि अधिकारी संजयअटक, कृषि सहाय्यक प्रदीप तिवाले यांची उपस्थिती होती.











