कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद
पाथरवाडी ग्रामस्थ आणि पुसद तालुक्यातील विविध आदिवासी संघटना तसेच राजकीय पक्ष यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. काल दिनांक १०/०५/२०२४ रोजी गट विकास अधिकारी नी एक पत्र दिले त्या पत्रात त्यांनी १७ मे च्या सुनावणीत निर्णय होईल.तो पर्यंत तुमचे हे आमरण उपोषण स्थगित करावे.या लेखी आश्र्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले आणि आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गावकऱ्यांनी शासनाला प्रखर ईशारा दिला की १७ मे च्या सुनावणी मध्ये जर मुख्याधिकारी कडून पाथरवाडी ग्रामवासीयांच्या विरोधात निर्णय दिला गेला तर पाथरवाडी मधील सर्व ग्रामस्थ १८ मे २०२४ ला संपूर्ण गाव खाली करून मुंबईकडे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पायदळ रवाना होणार असा निर्धार केला.तसेच आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित विविध सामाजिक संघटनांनी स्पष्ट केले की,जर आदिवासी समजावर अन्याय करणारा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला तर प्रशासनाच्या विरोधात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा दिला.सदर पत्रकार परिषदे घेण्यात आली होती सर्व आदिवासी समाज बांधव उपस्थित होता माधव वैद्य मूळ राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुसद, बुद्धरत्न भालेराव वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष, सुरेश धनवे,सुनील ढाले, गाव्हाले सर, देविदास डाखोरे, जयानंद उबाळे,डॉ राऊत,यशवंत कोल्हे,पांडुरंग व्यवहारे , मारोती भस्मे , समस्त गावकरी मंडळी उपस्थिती होते


