मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे : विवाह प्रसंगाच्या वेळी मिरवणूक करताना आणि काही उत्सवात जास्तीत जास्त डेसिबल आवाज केल्यानंतर डिजे वाल्यांवर होणार कारवाई न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार जर आवाज नियमित दिलेल्या डेसिबल मध्ये वाजविला नाही ठेवला नाही तर पोलीस प्रशासन त्या डीजेवाल्यावर कारवाई करणार असे ठाणेदार अजय अहिरवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. चांदूर शहर व तालुक्यामध्ये होणारे विवाह, जयंती दुर्गा गणपती विसर्जन तथा मंगल कार्यालयांमध्ये रात्री दहा नंतर विजेचा खूप मोठा असा कर्कश आवाज केल्यामुळे प्रशासन त्यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करणार संबंधित डीजे संचालक, मंगल कार्यालय मालक, सार्वजनिक उत्सव समिती, यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार. सर्वच होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अत्याधुनिक डीजे चा वापर केला जातो त्यामुळे याकडे पोलीस प्रशासन यानंतर बारकाईने लक्ष ठेवून असणार आहे व उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार जयंती,विवाह,दुर्गा,गणपती, विसर्जन असो यामध्ये कानाला बहिरेपण येतील इतका खूप मोठा आवाज असतो यावर हायकोर्टाने नियम घालून दिलेले आहेत मोठ्या आवाजामध्ये डीजे वाल्यावर पोलीस प्रशासन कारवाई केल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती ठाणेदार यांनी दिलेली आहे मोठ्या कर्कश डीजेच्या आवाजामुळे गर्भवती महिला, सत्तर वर्षाच्या पुढील बुजुर्ग म्हाताऱ्यांवर लहान मुलांवर त्यांच्या हार्टबीट वर दुष्परिणाम होता त. नियमानुसार60-65 डेसिबल पर्यंत आवाज असला पाहिजे परंतु तसे न राहता 80 ते 100 पर्यंत डेसिबल आवाज केला जातो 100 पर्यंत डेसिबल जर केला तर कानाची ऐकण्याची क्षमता नष्ट होते कानातील पडदे फाटू शकतात हा डेसिबल आवाज हृदयावर दुष्परिणाम करून हार्ट अटॅक येऊ शकतो कर्कश आवाज ऐकवला तर मानसिक संतुलन सुद्धा बिघडू शकते रक्तदाब असलेल्यांचा मृत्यू होऊ शकते ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे अशांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो 55 ते 65 डेसिबल आवाजामध्ये मंगल कार्यालयामध्ये वाजू शकतात परंतु शासकीय कार्यालय, रुग्णालय, शाळा, कॉलेज परिसरामध्ये आवाज कमी असला पाहिजे डीजे चालकावर पोलीस प्रशासन कारवाई करणार अशी माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली.