गावठी हातभट्टीची दारू धंदेवाल्यांचे धाबे दणाणले..
अविनाश पोहरे ब्युरो चिफ, अकोला
आज दिनांक १५/०३/२०२४ रोजी बेलतळा येथे प्रोरेड करून हजर असतांना १६/०० वा. चे सुमारास माहीती मिळाली असता मुर्लीधर गरदल राठोड हा विलास पवार याचे शेताचे पुर्वेकडील भागामध्ये नाल्यामध्ये असुन तो तेथे दारु गाळतो व विक्री करतो व तेथेच मोहाचे डबे आहेत. अशा खात्रीलायक बातमी लक्षात घेता ए.एस.आय अरविंद पवार, पो अं. विकास जाधव यांनी आज दि १५/०३/२०२४ असलेल्या पंचाना माहीती देवुन एक ईसम नाल्यामधुन खांदयावर मोठी कॅन द्रवाने भरलेली घेवुन येत असतांना दिसला त्यास जागीच पकडले व त्याचे खांदयावरील कॅन खाली उतरुन त्या कॅनचे बुच उघडुन त्यातील द्रवाचा वास पंचानी घेतला असता आंबट उग्रट दारुसारखा येत होता पंचाची दारु असल्या बाबत खात्री झाली असता सदर ईसमास त्याचे नांवगाव विचारले असता त्याने आपले नांव मुर्लीधर गरदल राठोड वय ६५ वर्षे रा. बेलतळा ता. पातुर जि. अकोला असे सांगीतले. त्याचे जवळील सदर कॅनमध्ये २० लिटर गावठी दारुने भरलेली असुन किं. ४००/-रुपये लिटर प्रमाणे एकुण किं.८,०००/- रुपये ची मिळुन आली तसेच त्याचे जवळच नाल्यामध्ये एकुण १५ डबे ज्यामध्ये प्रत्येकी १५ लिटर प्रमाणे एकुण २२५ लिटर सडवा मोहामाच प्रत्येकी लिटर किं. १००/-रुपया प्रमाणे एकुण किं. २२,५००/-रुपये व असा एकुण ३०,५००/-रुपयाचा मुद्देमाल घटनास्थळी मिळुण आला. सदर दारूच्या कॅन जप्त करण्यात आल्या.तसेच आरोपी मुर्लीधर गरदल राठोड वय ६५ वर्षे रा. बेलतळा पातुर कलम ६५ (ई) (फ) महा. दारुबंदी अधि. प्रमाणे होत असल्याने त्याचे विरुध्द सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच बाबाराव मूलचंद राठोड आरोपी फरार असून सदरची कारवाई पो.स्टे. ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. अभिषेक नवघरे,ए. एस.आय अरविंद पवार, पोलीस कॉन्स्टेबल विकास जाधव, होमगार्ड निलेश नाकट यांनी गुप्तपने केली.