सुमेध दामधर ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा:- सोनाजी नगर सोनाळा येथे जि.प. म. प्राथमिक शाळांमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष स्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुमेधभाऊ दामधर तर प्रमुख पाहुणे गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री पुंडलिक भाऊ मेहनकार आदिवासी जमातीचे रामलाल भाऊ नरगावे प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रमुख पाहुण्यांनी व अध्यक्षांनी पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला यावेळी काही मुलींनी मा जिजाऊचा वेशभूषा धारण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. वर्ग चौथी मधील विद्यार्थी प्रज्योत मेहनकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश जामनेकर, वरिष्ठ शिक्षक श्री मुस्तफा केदार, सहशिक्षक श्री गजानन बावणे, भगवान बावणे शाळेचे शिपाई गोरख डांगे, महिंद्रा होम फायनान्स चे श्री उमेश श्रीनाथ ज्येष्ठ नागरिक सौ पंचफुला बाई शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ज्योतीताई आणि गावातील आदी मान्यवर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री गणेश जामनेकर यांनी केले तर आभार वरिष्ठ शिक्षक श्री मुस्तफा केदार यांनी मानले.