गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा :- ग्रामपंचायत कार्यालय व पी एम श्री जिल्हा परिषद शाळा नारखेड येथे आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले याप्रसंगी नारखेड ग्रामपंचायत सरपंच प्रसेनजीत सुखदेव खंडेराव उपसरपंच बबीता डाबेराव ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री दीपक देशमुख गजानन डाबेराव जया डाबेराव ग्रामसेवक विशाल दाभाडे संगणक परिचालक प्रवीण इंगळे पाणीपुरवठा कर्मचारी शत्रुघन डाबेराव अरुण गाडे रोजगार सेवक वासुदेव फेरण तसेच अंगणवाडी सेविका सीमा तायडे संगीता राजपूत पुष्पा सुशीर सविता तांदळे ज्योती डाबेराव शारदा रोजतकार व पी एम श्री जिल्हा परिषद शाळा नारखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकुलसिंग डाबेराव उपाध्यक्ष स्वातीताई फुंडकर हस्ते दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र आखरे व सर्व शिक्षक शिक्षिका यांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये पालक विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नरसिंग डाबेराव, शिवहरी डाबेराव, छोटूबापू देशमुख,शिवा देशमुख, श्रीकृष्ण गावंडे, ज्ञानेश्वर लोड नागरिकांनी सहभाग घेतला होता.