बिहारीलाल राजपूत
तालुका प्रतिनिधी भोकरदन
भोकरदन येथे युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध राजकीय पक्षांतर्फे तथा शाळा व महाविद्यालया तर्फे शिवजयंती अती उत्साहाने साजरी करण्यात आली. बस स्थानका जवळील अश्वारुढ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्यास विवीध राजकीय,शैक्षणिक,व सामाजिक पुढारी व कार्यकर्त्यांनी पुष्पहार घातले.शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांनी जय भवानी जय शिवराय नावाचा जयघोष करीत रॅली काढली. शिवाजी हायस्कुल व मोरेश्वर महाविद्यालया पासून निघालेली रॅली भोकरदन वासीयांचे लक्ष वेधून घेत होती.त्यात प्रमुख आकर्षण ठरले ते मोरेश्वर महाविद्यालय येथे कार्यरत असलेल्या महीला प्राध्यापिकांनी तालावर खेळलेली लेझीम व घोषना.ह्यासाठी प्रा.निताली धनावत,प्रा.कवित्री वळवी,प्रा.स्वाती पैठने, आदींनी परिश्रम घेतले.
सदर जयंती च्या कार्यक्रमाला भोकरदन व तालुक्यातील ग्रामस्थ नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.