मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक ९/२/२०२४ शुक्रवारला दुपारी ४.०० वाजता संस्थानमध्ये “चंदन-उटी आणि रमणा” कार्यक्रम,सायंकाळी ५.३० वाजता सर्व बाहेर गावातील भाविक भक्त व गावकरी मंडळी करिता भव्य-महाप्रसादआयोजित करण्यात येणार आहे.या महाप्रसादाचे अन्नदान दाते अवधूत सांप्रदायिक भाविक भक्त अनिल भा. राऊत, नागपूर यांचे स्व-खर्चाने आणि संस्थानचे अन्नदान समितीचे नियोजनात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा.
दिनांक १०/२/२०२४ शनिवारला सकाळी ९.०० वाजता संस्थानमध्ये “पौष मास अखंड भजन मांड वाढवा” मुख्य मंदिरातून आरंभ होवून असंख्य भाविक-भक्तसह पूजा व भजनाचे गजरात लहान मंदिरातील बसविलेली ढाल उठवून मुख्य मंदिराचे सभा मंडपात मांडीचा वाढवा पंच आरतीने भाविकांना गुलाल लावून करण्यात येईल.ज्या भाविकांना संस्थानचे गोरक्षणातील गायी करिता चारा “दान” करावयाचा आहे, त्यांनी चारा पाठविण्यास संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थान तर्फे करण्यात येत आहे.संस्थान तर्फे “गुढीपाडवा-यात्रा महोत्सव” नियोजन तयार करण्यात आले आहे.या मध्ये भाविकांना बसण्यासाठी भव्य-मंडप,दर्शन बारी नेट-मंडप आणि यामध्ये थंड पिण्याचे पाणी व्यवस्था,भाविकांसाठी भोजन-व्यवस्था,बाहेर गावावरुन येणाऱ्या अवधूत भजन मंडळांना जागा सुविधा,सेवाधारी आणि स्वयंसेवक यांचे मंदिर-नियोजन, संस्थानच्या विविध यात्रा महोत्सव समित्या, इत्यादी प्रकारचे नियोजन संस्थानचे वतीने या वर्षी करण्यात येणार आहे.तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.