विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर: शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिकसळ येथे विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाचे धडे मिळावेत यासाठी बाल आनंद बाजार मेळावा व खाऊ गल्लीचे आयोजन करण्यात आलेले होते यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विक्रेते बनुन सर्व भाजीपाला व खाऊगल्ली साठी खूप सारे पदार्थ बनवून स्वतः विकण्याचे धडे आज घेतले छोट्याशा शाळेमध्ये सारा गाव एकत्र होऊन हा आनंद बाजार विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी गावाने सहभाग घेतला व यामध्ये किमान 25 हजार रुपये किमतीची आर्थिक उलाढाल झाल्याचे या ठिकाणी दिसून आले सर्व विद्यार्थी यांनी बाजारामध्ये मिळणारा सर्व भाजीपाला विक्रीसाठी ठेवलेला होता त्याचबरोबर खाऊ गल्लीमध्ये बिर्याणी पासून पावभाजी, वडापाव ,पुरी भाजी, ,आप्पे ,मिसळ ,ओली भेळ, सुकी भेळ, इडली सांबर ,उत्तप्पा, यासारखे खाऊ पदार्थ विक्रीस ठेवले होते डिकसळ गावातील सर्व ग्रामस्थांनी या शाळेच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवण्यास मदत केली व विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार स्वतः पार पडल्यामुळे त्यांना त्यांच्याही व्यवहारिक ज्ञानात चांगली भर पडल्याचे मत केंद्राचे केंद्रप्रमुख हनुमंत शिंदे यांनी व्यक्त केले याप्रसंगी अनिल लोंढे डिकसळ गावचे यांनी 48 इंची स्मार्ट टीव्ही शाळेला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले त्याचबरोबर गावच्या सरपंच मनिषा गवळी यांनी ग्रामपंचायत डिकसळ च्या वतीने शाळेला दुसरा 48इंची स्मार्ट टीव्ही देण्याचे मान्य केल्याने विद्यार्थ्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले शाळेच्या वतीने आयोजित केलेला कार्यक्रम पाहून सर्व ग्रामस्थ पालक वर्ग ,पदाधिकारी भारावून गेलेले दिसून आले सर्वांनी अति उत्साहामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन सतीश दराडे सर यांनी सर्वांचे स्वागत करून त्यांचे आभार मानले यासाठी सर्व ग्रामस्थ, पालक, व्यवस्थापन समिती सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी व सर्व महिला वर्ग यांनी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती सुरेखा वाघ यांनी मानले.