शिवाजी पवळ
ग्रामीण प्रतिनिधी श्रीगोंदा
श्रीगोंदा : तालुक्यातील तांदळी दुमाला येथील कु.आयशा शकूर शेख हिला चंद्रपूर श्री महिला किताब प्रदान झाल्याबद्दल न्यू आर्टस सायन्स कॉलेज पारनेर च्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी गंगाराम फोडदे सर,सातव सर, हनुमंत फंड सर, आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीगोंदा तालुक्याची सुकन्या महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड व इंटरनॅशनल कुस्तीपटू धनश्री फंड यांच्या बरोबर राहून आपल्या गावाचे व श्रीगोंदा तालुक्याचे नाव लौकिक करण्यासाठी आयशा शेख गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य हरियाणा व इतर राज्यांमध्ये अनेक किताबाची मानकरी ठरली आहे यामध्ये आत्ता नुकताच तिला चंद्रपूर श्री महिला किताब प्रदान करण्यात आले तसेच दोन नॅशनल किताब, तीन महिला केसरी किताब, एक ताराराणी महिला केसरी किताब अकलूज, एक इंटरनॅशनल स्कूल विभाग पंढरपूर किताबाची मानकरी ठरली आहे त्याबरोबर अनेक सन्मान चिन्ह ट्रॉफी गोल्ड मेडल सिल्वर मेडल तिने मिळवली आहे आयशा शेख हिचे श्रीगोंदा तालुक्यातील सर्वत्र कौतुक होत आहे. महीला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड, इंटरनॅशनल कुस्ती चॅम्पियन धनश्री फंड व महिला पैलवान आयशा शेख यांनी मिळवलेल्या यशामागे कोच सातव सर व मेजर हनुमंत फंड यांचा सिंहाचा वाटा असल्याचे आयशा शेख हिने सांगितले.