सुरतान पावरा
तालुका प्रतिनिधी अक्राणी
अक्कलकुवा शहरालगत सोरापाडा येथील श्री कालिका देवी मंदिराच्या भव्य परिसरात १३ व १४ जानेवारी रोजी विविध संघटनाच्या वतीने आमदार आमच्या पाडवी यांच्या निवृत्ताखालील भव्य महा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनासाठी आवश्यक असलेल्या भव्य सभा मंडप व आदी सुविधांच्या तयारीला वेग आला आहे. नंदुरबार जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांनी कार्यक्रम स्थळी तयारीचा आढावा घेत पाहणी केली व संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.


