अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
निर्गुण निराकार दत्तात्रय महाराज दत्त जयंती ढाणकी येथे संत श्री बाळगीर महाराज दत्त मंदिर मठ संस्थान या ठिकाणी मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली. हजारोचा जनसमुदाय या ठिकाणी जमला होता. मंदिर हे आंब्याचे तोरण ,झेंडूचे पुष्प हार, लायटिंग व झिलच्या रोषणाईने अधिकच प्रसन्न दिसत होते. चला चला हो चला माहुरी चला हो दत्ताचा माझा सोहळा पाहण्या चालाहो ||ध्रु||.दत्त जयंती पौर्णिमेला बाल दत्तात्रय जन्म झाला देवादिकांनी फुलांचा वर्षाव केला हो दत्ताचा माझा सोहळा पाहण्या चला हो||१||.या पदा प्रमाणे ढाणकी नगरीमध्ये जणू साक्षात माहुरचे दत्तशिखर अवतरले दत्त नामाच्या गजरात मंदिर व गाव दुमदुमून निघाले .भक्तिमय वातावरणात जणू माहूर नगरीचे दत्तराय साक्षात प्रकट झाले.असे प्रसन्न वातावरण होते.रूप पाहता लोचणी सुख झाले हो साधनी या प्रमाणे दत्तात्रय महाराज यांचे रूप अत्यंत मनमोहक व प्रसन्न दिसत होते. बाळक्रीडा पोती श्री दत्ता महाराज मोरेवाड वाचक व सुचक हे स्वतः होते.दत्त जयंती साजरी करण्यास मोलाचे सहकार्य राष्ट्रवादी शहर अध्यक्ष भास्कर पाटील चंद्रे,नारायण रावते,वसंत फुल्लकोंडवार,शेषराव नरवाडे,दिगांबर शिरडकर,परसराम उपेवाड ,अशोक फुल्लकोंडवार, ई सहकार्य लाभलेअशा प्रकारे दत्त जन्म सोहळा संपन्न करून आरती करण्यात आली.