कैलास शेंडे
तालुका प्रतिनिधी, तळोदा
तळोदा : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंती दिवस हा भाजपकडून देशभरात सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तळोदा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील आशिष पार्क येथे स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ शशिकांत वाणी,डॉ स्वप्निल बैसाने, पंचायत समिती सदस्य विक्रम वळवी,रूपसिंग पाडवी,खरेदी विक्री संघाचे संचालक संजय चौधरी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमृत गायकवाड,सत्तरसिंग राजपूत,माजी तालुका अध्यक्ष यशवंत पाडवी, शिरीष माळी,भगवान मगरे,नंदू जोहरी, चंद्रकांत शिंदे,चिनोदा उपसरपंच राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक रामानंद ठाकरे,दिपक पाडवी, संजय चौधरी, देवेश जोहरी,छोटू कलाल, कोमलसिंग राजपूत,निंबा गिरासे, छत्रसिंग राजपूत दिलीप भदाणे वासुदेव पाडवी,आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.











