अमोल सावंत
तालुका प्रतिनिधी केज
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (भारत) महाराष्ट्र राज्यचा सातवा वर्धापण दिन व सन्मान कर्तुत्वाचा सोहळा यावर्षी परभणी जिल्ह्यांतील मानवत येथे होणार असल्याच्या अनुषंगाने केज शाखेची बैठक घेण्यात आली.
मानवत येथे रविवार दि. ७ जानेवारी २०२४ रोजी संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा मानवत टाईम्सचे संपादक श्री.गोपाळ तातेराव लाड यांच्या आयोजनातून होत असलेल्या या सोहळ्यास उपस्थित राहण्याच्या तसेच त्या संदर्भातील विविध विषयावर चर्चेच्या निमित्ताने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या केज शाखेची बैठक दि.२५ डिसे. रोजी दु.२:३० वा. येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. संघाच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील पञकारांच्या व समाजातील जनतेच्या विविध समस्येवर काम करत संघाने यशाचे पाउल पादक्रंत केले आहे .यावेळी पत्रकार संघातील अध्यक्ष , सचिव यांच्यासह इत्तर सभासदांची उपस्थिती होती.