संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर -इंदापूर येथील दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघावरती असलेल्या श्री दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती सोहळ्यानिमित्त मंगळवारी (दि.26) दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.संघाचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दूधगंगा संघावरती सन 1998 मध्ये श्री दत्त मंदिराची उभारणी करण्यात आली.त्यावेळी पासून श्री दत्त मंदिरामध्ये श्री दत्त जन्मोत्सव सोहळा भव्य व दिव्य प्रमाणात साजरा करण्यात येत आहे.श्री दत्त मंदिरामध्ये गुरुचरित्र पारायण समाप्ती निमित्ताने मंगळवारी (दि.26) सकाळी 9.30 वा.दूध संघाचे संचालक व भाजप युवा मोर्चाचे इंदापूर तालुका कोअर कमिटी प्रमुख राजवर्धनदादा पाटील यांच्या हस्ते आरती होणार आहे.त्यानंतर मंदिरामध्ये दत्त याग यज्ञ विधी संघाचे उपाध्यक्ष विक्रम कोरटकर यांच्या हस्ते सपत्नीक सकाळी 9.30 वा. पासून सुरु होणार आहे.तर सायंकाळी 4 वा. भजनी मंडळाचा कार्यक्रम सुरू होईल. त्यानंतर सायंकाळी 6 वा.फुले पडून श्री दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न होईल. श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यानंतर आयोजित भव्य महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा,असे आवाहन राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.