मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
समानगाव येथे आपल्या आजोळी मा.वसंतराव कापरे पाटिल यांचे भाचे आलें आसता ते अमेरिका न्युयॉर्क येथील बँक ऑफ अमेरिकेचे वरिष्ठ संचालक मा.धैर्यशिल देशमुख यांचा शाहु, फुले,आंबेडकर ,साठे, कलाम ,सामाजीक विचार मंचाच्या वतीने संविधान उद्देशिका भेट देऊन गौरव सत्कार करण्यात आला.श्री शाहूराव पाटील कापरे विद्यालय सामनगाव येथे मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आले असता.शाहू ,फुले, आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे सर यांच्या हस्ते धैर्यशील देशमुख यांचा महाराष्ट्राच्या मातीचा रांगडा सन्मान म्हणजे मानाचा फेटा बांधून व भारताचे संविधान उद्देशिका भेट देऊन त्यांचा छोटाखाणी सत्कार करण्यात आला.ह्या छोट्या खाणी सत्काराच्या कार्यक्रमाचे नियोजन आरोग्य अधिकारी कवि.मा.मिलिंद दादा कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास संबोधित करताना धैर्यशील देशमुख यांनी मुलांशी सुसंवाद साधला. शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या अडचणी वर मात करा. आणि तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन,सहकार्य करीन व तुमच्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभा राहिन अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा. वसंतराव कापरे पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांचे आभार मानले.ह्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सुरेश कापरे पाटील,भाऊसाहेब काकडे,पोलीस पाटील रमेश भुसारे सर,संजय खरड पाटील,दत्तात्रय खरड पाटील,भाऊसाहेब कांबळे,फेटा नियोजन राहुल भालेराव इत्यादी मान्यवर व विद्यार्थीवर्ग,पालक,
शिक्षकवृंद सामनगावातील समस्त गावकरी या कार्यक्रमास उपस्थित होते.