गजानन डाबेराव
ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा :-मलकापूर नांदुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.राजेशभाऊ एकडे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशानात
मांडल्या जनतेच्या समस्या व अडचणीआमदार श्री.राजेशभाऊ एकडे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशानात मांडल्या जनतेच्या समस्या व अडचणी
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात आमदार राजेश एकडे यांनी जनतेच्या समस्या व अडचणी 42 तारांकीत, अतारांकीत प्रश्नाच्या माध्यमातुन उपस्थित केल्या त्यापैकी 30 प्रश्न सभागृहात स्विकृत झाले,तर 14 लक्षवेधी सुचना मांडल्या त्यापपैकी 2 लक्षवेधी सुचना स्विकृत झाल्या तर 5 पैकी एका औचित्याच्या मुद्यावर मलकापूर नगर पालीका शास्ती कर माफ करण्यासंदर्भात चर्चा झाली. आणि 293 अंतर्गत सभागृहामधील चर्चे दरम्यान सुशिक्षीत बेरोजगारांची वाढती संख्या, एम.आय.डी.सी.मध्ये गरजु उद्योजकांना जाचक अटीमुळे भूखंड मिळण्यास येणारी अडचण, कापसू ते कापड प्रक्रीया करण्यात येणारा प्रकल्प,अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पिकविमा याबाबत विस्तृत कथन करुन प्रश्नांना वाचा फोडली
राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे. खास करुन मलकापूर व नांदुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झालेले आहे,त्याची नुकसान भरपाई शासनाने त्वरीत दयावी अशी मागणी प्रश्न उत्तरादरम्यान सभागृहात केली. त्याच प्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह विमा कंपनीकडून पिक विमा परतावा देण्यात यावा.राज्यातील राष्ट्रीयकृत बँकाच्या जाचक अटीमुळे लाखो शेतकरी प्रोत्साहनपर अनुदाना पासुन वंचित आहेत त्या अटी शिथील करण्यात याव्यात, राज्यातील सोयाबीन पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा,राज्यातील अंगणवाड्यांमध्ये पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, उच्च शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्वाधार शिष्यवृत्ती अंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात यावी, राज्यातील भंगार एस.टी.बसेसेची दुरुस्ती करण्यात यावी,राज्यातील शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजने पासुन वंचीत आहेत त्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा, राज्यातील अनेक जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळी स्थितीनिर्माण झाली आहे यावर उपाय योजना करण्यात याव्यात, राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्या मान्य कराव्यात, राज्यातील तलाठी पदभरती परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यात यावा,विविध पदभरती परिक्षांकरीता अवास्तव शुल्क आकारण्यात येऊ नये.
जलस्वराज्य कार्यक्रम विहित कालावधीत न राबविल्याने निधी समर्पित केल्याबाबत. कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, राज्यातील शिक्षण हक्क अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काच्या प्रतिपूर्तीबाबत.मलकापूर (जि.बुलढाणा) येथील उन्नती महिला नागरी पतसंस्थेने ठेवीदारांची केलेली फसवणुकीबाबत.
नगर परिषद नांदुरा जि.बुलढाणा अंतर्गत हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवासाठी आलेल्या
भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात, जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील बोदवड सिंचन प्रकल्प प्रलंबित आहे तो लवकर पुर्ण करण्यात यावा, बुलढाणा जिल्ह्यात महिला, पुरुष व बालकेही बेपत्ता होत आहेत याबाबत पोलीस विभागाने सतर्क रहावे, मलकापूर येथील डायलिसीस सेंटरसाठी आवश्यक असलेली खरेदी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात येवून सेंटर सुरु करण्यात यावे, नांदुरा नगरपरिषद येथील प्रारुप विकास योजना नवीन नियोजन प्रमाणकानुसार सुधारीत करण्यात यावी, निमगांव ता.नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरीत उभारण्यात यावे, मलकापूर येथे आगाराच्या नवीन इमारत बांधकामासह सोयी सुविधा पुरविण्याबाबत शासनाकडून मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, प्राथमिक आरोग्य केंद्र बुलढाणा जिल्हा परिषद येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रजा रोखीकरणाचे व वैद्यकीय प्रतिपुर्तीच्या देयक अदा करण्यात यावे, ग्रामिण भागातील रस्त्यांच्या दुरावस्था दुर करण्यात यावी. राज्यस्तरावर अनुसूचित जाती जमातीच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र आयोग गठीत
करण्यात यावा.
तसेच खालील बाबींवर लक्षवेधी उपस्थित करुन शासनाचे लक्ष वेधनाचा प्रयत्न आमदार राजेशभाऊ एकडे यांनी हिवाळी अधिवेशनात केला मलकापूर येथील जगत ऊर्फ जग्गु रामचंद्र वानखडे यांच्यासह शेतकऱ्यांची 100कोटी रुपयाची फसवणूक करुन फरार झालेला आहे ,त्याचा शोध घेण्यात येवून अटक करुन योग्य ती कायदेशीर दंडात्मक कार्यवाही करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा.
बुलढाणा जिल्ह्यातील पोखरा योजनेचे 69.65 कोटी रुपये थकीत अनुदान अदा करण्यात यावे.मलकापूर मतदार संघातील नांदुरा तालुक्यात सामुहिक लाभार्थ्यांची अट शिथील करुन सिंचन विहीरीचा लाभ देतांना वैयक्तीक लाभार्थ्यांना देण्यात यावा. मलकापूर मतदार संघातील मलकापूर तालुक्यातील मलकापूर व नरवेल या महसूल मंडळाचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश करण्यात यावा, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिक विमा कंपनीने विम्याचे 59 हजार तक्रारी नाकारले आहेत ते स्विकारण्यास भाग पाडावे, नगर परिषद मलकापूर येथील मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्यात यावा अशा प्रकारे मतदार संघातील शेतकरी, शेतमजुर, बेरोजगार तसेच सर्वच स्तरातील नागरीकांच्या समस्या विधान भवनावतील सभागृहात आमदार राजेश एकडे यांनी मांडल्या.