पद्माकर धुरंधर
तालुका प्रतिनिधी खामगाव
शेगाव येथे विश्रामगृहावर दिव्यांग रोजगार व मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरिता नॅशनल ह्यूमन राइट्स बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रतिभा जगदाणे पाटील व दिव्यागशक्ती संपादक मनोज नगर नाईक चंद्रकांत शिंदे यांनी दिव्यांग बांधवांना रोजगार व शासनाच्या योजना समाज कल्याण व बिज भांडवल बँक कर्ज इलेक्ट्रिक व्हीकल ई सेवा केंद्र फिरते दुकान विषयी माहिती दिली. प्रतिभा पाटील नॅशनल मानव अधिकार बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रतिभा पाटील यांनी महिलावर होणाऱ्या अन्याय महिला सबलीकरण महिलांना रोजगार कसा प्राप्त होईल याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास चंद्रकांत शिंदे, पद्माकर धुरंधर, शेखर तायडे, शत्रुघन इंगळे, शिवशंकर कुटे, गजानन कुलकर्णी, शेख रईस, व शेगाव येथील दिव्यांग बांधव, उपस्थित होते.