विनोद शर्मा
तालुका प्रतिनिधि चिमूर
चिमूर-आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील पारडपार येथे माँ माणिका देवी महिला मंडळाच्या वतीने नागदिवाळी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. यावेळी सर्वप्रथम माँ माणिका देवीची भक्तिभावाने पूजाअर्चा करून मनोभावे दर्शन घेतले व सर्व थोर महात्म्यांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित आदिवासी, माना समाज बांधवांना विविध विषयांवर संबोधित करून नागदिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. दरम्यान, आमदार बंटीभाऊंचे आगमनाप्रसंगी मंडळाच्या वतीने उपस्थित माता-भगिनींनी औक्षण केले, पारंपारिक पिवळा दुपट्टा व पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने भाजपा तालूकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस ममताताई डुकरे, माजी भाजयुमो तालुकाध्यक्ष किशोर मुंगले, भाजपा नेते लीलाधर बन्सोड, सरपंच्या नीलिमाताई चौधरी, विनोद खेडकर, किशोर नेरलवार, विलास घोडमारे, हरीभाऊ मेश्राम, भाजपा बूथ अध्यक्ष कैलास घोडमारे, हर्षल डुकरे व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि आदिवासी, माना समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.











