संतोष पोटपिल्लेवार
शहर प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- नगर परिषद
क्षेत्रात वाढीव १२ आंगणवाड़ी ची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडे हिवाळी अधिवेशन मध्ये जावुन घाटंजी महिला आघाडीच्या अध्यक्ष रीना धनरे यांनी केली आहे. तसेच राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या कड़े वाढीव अंगणवाडी चे निवेदन सादर केले आहे.
घाटंजी नगर परिषद क्षेत्रात १७ वार्ड असून सध्या ६ अंगणवाडी सुरु आहेत तरी अजून १२ वार्डांत अंगणवाडीची आवश्यकता आहे. त्या भागातील मुले पूर्व प्राथमिक शिक्षण, त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा, त्यांना मिळणारे पोषण आहार पासून वचिंत राहत असल्याने या भागातील कुपोषण असलेल्या बालक असल्यास त्यांना सुद्धा आरोग्य व आहार सुविधा मिळत नाही.अंगणवाडी नसलेल्या भागात गरोदर माता सुद्धा पोषण आहार पासून वंचित राहत आहे.
सदर शिल्लक राहिलेल्या भागात अंगणवाडी देणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिति तटकरे यांनी त्वरित दखल घेण्याचे आश्वासन दिले रिना धनरे यांना दिले आहे.