अमृत कारंडे
तालुका प्रतिनिधी, जामखेड
लोकप्रिय आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील साकत येथे माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर मित्र मंडळ साकत यांच्यावतीने 1 जानेवारी 2024 रोजी पुनम कुडाळकर यांचा लावणी महोत्सव तुमच्यासाठी काय पण तसेच नागरिकांना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी तसेच आमदार प्रा.राम शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान यावेळी डॉ.भगवान मुरूमकर यांनी केले आहे.
ठिकाण विठ्ठल मंदिर समोर साकत येथे तर खर्डा येथे 2 जानेवारी रोजी आपल्या लावणींने आपल्या तरुणाईला भुरळ घालणारी आणि नेहमी चर्चेत राहणारी सबसे कातील गौतमी पाटीलच्या लावणीचा जलवा आता खर्डा मध्ये दिसणार आहे.
येत्या 2जानेवारी 2024 गौतमी चा लावणीचा कार्यक्रम होणार आहे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाची भारतीय जनता पार्टी खर्डा गट यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.2 जानेवारी 2024 रोजी मार्केट कमिटी ग्राउंड खर्डा या मैदान परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. गौतमी पाटील सध्या आपल्या लावणीमुळे चांगलेच चर्चेत आहेत. तिच्या अदाकारीची तरुणाई मध्ये मोठी क्रेज देखील आहे. प्रत्येक कार्यक्रमाला तरुणाईची मोठी गर्दी असते. त्यांनी आजपर्यंत केलेल्या लावणीच्या कार्यक्रमात तरुणाईने धिंगाणा घातल्याने अनेक वेळा गौतमी यांचा कार्यक्रम चर्चेत आला होता. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.