सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा
आळेफाटा येथील उपबाजारात मंगळवारी (ता .१९) कांद्याच्या ३२ हजार ५०३ पिशव्यांची आवक झाली .एक नंबर कांद्यास दहा किलोला २७१ रुपये बाजारभाव मिळाला अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे , संचालक प्रीतम काळे ,सचिव रुपेश कवडे व व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली .बाजारात मोंढा मधे एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोस २७१ रुपये भाव मिळाला तर एक नंबर कांद्यास २४१ ते २७१ बाजारभाव मिळाला .दोन नंबर कांद्यास २००ते २४१ रुपये भाव मिळाला .











