एक हायवा एक टिप्पर व जेसीबी सह तीन वाहणे महसूल विभागाच्या ताब्यात
गजानन वानोळे
ग्रामीण प्रतिनिधी किनवट
मौजे पांगरी शिवारामध्ये जेसीबीच्या साह्याने गौण खनिजाचे उत्खनन अवैधरीत्या करत असताना दि.21रोजी. किनवट महसूल प्रशासनाने अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करणाऱ्या एक हायवा एक टिप्पर व जेसीबी, यु .एन .डी. इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वाहनावर सदरील महसूल प्रशासनाने धडाकेबाज कारवाई करून पोलिसाच्या ताब्यात दिल्याने गुत्तेदारी क्षेत्रातील व अवैधरित्या रॉयल्टी न काढता उत्खनन करणाऱ्या अनेक तस्कराची धावे दणाणले. पांगरी शिवारातील राज्य रस्त्यावरील काम गेल्या वर्षभरापासून चालू आहे. या कामावर अवैधरीत्या मुरूम आणत असताना हायवा टिप्पर क्रमांक एम .एच.24/ऐ. व्ही . 67 76 व टिप्पर क्रमांक एम एच 27/ई.एक्स .0153 व व जेसीबीच्या साह्याने गौण खनिजाचे उत्खनन अवैधरीत्या करत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला प्राप्त झाल्याने. याप्रकरणी कुठल्याही संदर्भात कुणालाही माहिती न मिळू देता किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी एस. कार्तिकीयेन व किनवटच्या तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांनी माहिती गुप्त ठेवून महसूलच्या पथकास सदरील घटनास्थळाकडे पाठवून दिले. या पथकातील पथक प्रमुख नायब तहसीलदार विकास राठोड मंडळ अधिकारी प्रेमानंद लाटकर, तलाठी बालाजी वसमतकर ,अंकुर सकवान, विश्वास फड, मंगेश बोधे, व वाहन चालक गौसखान यांनी मोठ्या धाडसाने सदरील कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. व तिन्ही वाहणावर कारवाई करून घटनास्थळी पंचनामा केला व ताब्यात घेतले महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे अनेक गुत्तेदार क्षेत्रातील मंडळीचे व अनाधिकृत रित्या व रॉयल्टी न काढता उत्खनन करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र इस्लापूर परिसरात पहावयास मिळत आहे. महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले.