अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अकोला व कार्यलयीन संस्था सर्ग विकास समिती अंतर्गत स्थापित पंढरीनाथ जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी ली साखरा तालुका वाशिमच्या समूह संकलन केंद्र (CAC) चे भूमिपूजन मा.बुवनेश्वरी एस मॅडम जिल्हाधिकारी वाशिम यांच्या हस्ते पार पडला.या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.आरिफ शाह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम यांच्या सह मा.अनिसा महाबळे मॅडम प्रकल्प संचालक आत्मा वाशिम, मा.अतुल जावळे तालुका कृषी अधिकारी वाशिम, मा.भागवत नागरगोजे मंडळ कृषी अधिकारी वाशिम,कृषी सहायक एम.डी सोळंके कु.आर.डी.इढोळे मॅडम तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे, कार्यालय सहाय्यक जिल्हा व्यवस्थापन कक्ष वाशिम संदीप मोरे कंपनीचे अध्यक्ष पांडुरंग जनार्दन राऊत व सचिव रामराव पांडुरंग भोयर, कंपनीचे (सीईओ)महादेव भानुदास पदमने व हरिषचंद्र अवचार मास्टर ट्रेनर वाशिम कंपनीला जागा देणारे शेतकरी जनार्धन निवृत्ती राऊत साखरा येथील सरपंच सौ अनिता पांडुरंग राऊत तसेच कंपनीचे सर्व संचालक व शेतकरी सभासद उपस्थित होते.एकूण 10 गटाचे मिळून एक समहु संकलन केंद्राची स्थापन करण्यात येत असून उत्पादित होणारा सेंद्रिय मला त्या ठिकाणी प्राथमिक प्रक्रिया करून विक्री व्यवस्थापन त्या ठिकाणी केले जाईल. या वेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.