व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधि अहेरी
अहेरी भामरागड तहसीलमधील तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी आणि त्यांना त्यांच्या जीवनात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक२०/१२/२०२३ ते २०/१२/२०२३ या कालावधीत २० युवक-युवतींना एक महिन्याचे भरतीपूर्व प्रशिक्षण, लक्ष्य अकॅडमी मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अंतर्गत ३७ बटालियन द्वारे संचालित करण्यात आले होते. ज्याची पूर्णता दिनांक २१/१२/२०२३ रोजी श्री एम.एच.खोब्रागडे, कमांडंट-३७ बटालियन यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
यावेळी ३७ बटालियन कमांडंट श्री.एम.एच.खोब्रागडे म्हणाले की, सर्व तरुणांनी आपले मनोबल वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे व कोणत्याही अपयशाने खचून न जाता त्या अपयशातून धडा घेऊन पुढे जावे. केंद्रीय सशस्त्र दलातील भरती आणि त्यासंबंधीची माहिती त्यांनी सर्वांना दिली. केंद्रीय राखीव पोलीस दलाला आशा आहे की तरुणांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आपल्या भागातील लोकांचा नक्षलवादापासून भ्रमनिरास करून त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यात मदत होईल.या कार्यक्रमाला लक्ष्य अकादमीचे संचालक सतीश पानगंटीवार, उपसंचालक विनोद दहागावकर, शिक्षक शुभम नीलम, सोनाली दुर्गे, अधिवक्ता पंकज दहागावकर, त्रिशूल डांगरे व ३७ बटालियनचे अधिनस्त अधिकारी व जवान उपस्थित होते.